सडकअर्जुनी(अनिल मुनीश्वर):—————————————————तालुक्यातील डव्वा/पळसगाव येथील प्रज्ञा बुद्ध विहार समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांच्या आयोजनासह जयंती महोत्सव साजरा करण्यात आले आहे.आज 13 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता बुद्ध वंदना, सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार इंजिनीयर राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून प. स.सभापती चेतन वडगाये सडक अर्जुनी, आनंद चंद्रिकापुरे, जि. प. सदस्य शैलेश नंदेश्वर, माजी जि. प. सदस्य गंगाधर परशुरामकर,सरपंच योगेश्वरी चौधरी, पंचायत समिती सदस्य शालिंदर कापगते,सरपंच प्रशांत बालसनवार, आदी मान्यवार उपस्थित राहतील. रात्री 7. 30 वाजता बुद्ध व भीम गीतावर आधारित नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समूह नृत्य स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 15000 रुपये, द्वितीय पारितोषिक 10000, तृतीय पारितोषिक 5000 रुपये, चतुर्थ पारितोषिक 3000 रुपये देण्यात येणार आहे. एकल नृत्य स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 5000 रुपये, द्वितीय पारितोषिक 3000 हजार रुपये तृतीय पारितोषिक 2000 रुपये चतुर्थ पारितोषिक 1500 रुपये देण्यात येणार आहे. तसेच 14 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 9 वाजता रांगोळीस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 1000 रूपये, द्वितीय पारितोषिक 700 व तृतीय पारितोषिक 500 रुपये देण्यात येणार आहे. तसेच हार स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 1000 रुपये द्वितीय 700 रुपये व तृतीय 500 रुपये देण्यात येणार आहे आहे. सकाळी 10 वाजता ध्वजारोहण,सकाळी 11 वाजता मान्यवरांचे मार्गदर्शन, सायंकाळी 4 वाजता धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.






