भीम जयंती सोहळ्यानिमित्त सडक अर्जुनी येथे विविध कार्यक्रम 14 रोजी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भीम जयंती सोहळ्यानिमित्त सडक अर्जुनी येथे विविध कार्यक्रम 14 रोजी.

सडकअर्जुनी(निखिल मुनीश्वर):————————————————–
येथील संबोधी बौद्ध विहार समिती च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त सडक अर्जुने येथे 13 व 14 एप्रिल2026 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 13 एप्रिल 2026 रोजी रात्री 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ शिक्षक विलास कोटांगले व मिलिंद राऊत यांच्या हस्ते केक कापण्यात येणार आहे आहे. तर 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजता संबोधी बुद्ध विहार सडक अर्जुनी येथे बुद्ध वंदना घेण्यात येणार आहे.त्यानंतर ध्वजारोहण शिक्षक बाळकृष्ण सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी 9.30 वाजता स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अमित बनसोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी 10:30 वाजता पटेल वार्ड येथे ध्वजारोहण व बुद्ध वंदना, सकाळी 11 वाजता आनंद नगर प्रभाग क्रमांक 3 येथे ध्वजारोहण व बुद्ध वंदना, दुपारी 3 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथून धम्म रॅलीच्या शुभारंभ करण्यात येणार असून सायंकाळी 7 वाजता सामूहिक भोजन, रात्री 7.30 वाजता जयंती सोहळ्यानिमित्त मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन भंडारा-गोंदिया लोकसभा शिवसेना संघटक डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजि. राजकुमार बडोले हे राहणार आहेत. तर सह उद्घाटक म्हणून डॉ. अजय लांजेवार, गव्हर्मेंट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर वसंत लंजेवार हे उपस्थित राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष तेजराम मडावी, नगरपंचायत मुख्याधिकारी सारंग खांडेकर पोलीस निरीक्षक गणेश वनारे दुग्गीपार, नगरपंचायत उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, कर अधिकारी युगल डडेमल दिनेश पंचभाई, प्रमोद फुले, संस्थापक जितेंद्र कुमार मौर्य, पं.स. सदस्य अल्लाउद्दीन राजानी, इंजि. किशोर बनसोड,
प्रा.संजय शेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद बांबोर्डे, दुर्योधन राऊत, नवसाद अली, संस्थापक रवींद्र पंचभाई,
प्रा. संतोष रामटेके प्रा. दिवाकर कांबळे प्रशांत सोनटक्के, सुरेश अगडे, नगरपंचायत सभापती साहिस्ता शेख, कमलादेवी अग्रवाल, सायमा शेख, नगरसेवक असलेस अंबादे, आनंदकुमार अग्रवाल, देवचंद तरोने, गोपीचंद खेडकर,महेंद्र वंजारी,अंकित भेंडारकर,प्राचार्य राजकुमार हेडाऊ, नगरसेविका शशिकला टेंभुर्णे , दीक्षा भगत, कमिनी कोवे,रेणुका अग्रवाल, डॉ. रिता लांजेवार, पत्रकार संघांचे अध्यक्ष अनिल मुनीश्वर,बिरला गणवीर, डॉ. राजकुमार भगत,ओम प्रकाश टेंभुर्णे सुशील लाडे, राजेश मुनिश्वर, शाहिद पटेल,अशोक इडपाते यांचे सह इतर मान्यवर उपस्थित राहतील. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष विदेश टेंभुर्णे, सचिव भाग्यवानकुमार शहारे रंजीता मेश्राम, जयंत शहारे, रूपचंद खोब्रागडे यांच्या सह कार्यकारिणीच्या इतर सदस्यांनी केले आहे.

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें