कबड्डीमुळे युवकांमध्ये शिस्त, संघभावना व आत्मविश्वास वाढतो- माजी मंत्री आ. राजकुमार बडोले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(अनिलमुनीश्वर)——– —— —

तालुक्यातील कोयलारी/ शेंडा येथे आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले उपस्थित होते. यावेळी सर्व खेळाडू, मान्यवर, ग्रामस्थ व कबड्डीप्रेमींचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
मार्गदर्शन करताना आ. राजकुमार बडोले म्हणाले की, कबड्डी हा आपल्या मातीचा खेळ असून तो केवळ शारीरिक बळ वाढवत नाही, तर संघभावना, चपळाई, शिस्त व उत्साह निर्माण करतो. ग्रामीण भागातील युवकांनी अशा स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या क्रीडा कौशल्याचा विकास करावा असे आवाहन केले. या स्पर्धेत सहभागी सर्व संघांनी उत्कृष्ट खेळ सादर करून गावाचा व तालुक्याचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. क्रीडा क्षेत्राचे महत्त्व विशद करत, खेळातूनच शिस्तबद्ध व सक्षम पिढी घडत असल्याचे नमूद केले.
यावेळी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष ललित डोंगरवार, भाजपा महामंत्री हितेश डोंगरे, रजनीकांत वालदे सरपंच, कोयलारी, कैलाशजी भेंडारकर,खडकीचे उपसरपंच ओमराज दखणे,देवानंद गहाणे, दूधराम दखने, उदारामजी कापगते, विश्वजीत बडोले, डॉ. ठेंबरे, कैलाश राऊत, सुनीताताई इलपाते आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने गावकरी व युवक उपस्थित होते.

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें