देवरी(अनिल मुनीश्वर):——– — ——-
दिनांक १२ जानेवारी २०२६ रोज सोमवारला राजमाता जिजाऊ जयंती, राष्ट्रीय युवा दिन व शिक्षणमहर्षी झामसिंग येरणे यांचा दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी असलेल्या अमृत महोत्सवी ७५वा वाढदिवसाप्रसंगी स्थानिक देवरी येथील सी. एस. आयुर्वेदीक महाविद्यालय व हॉस्पिटल येथे शास्त्रोक्त व आयुर्वेदीक पद्धतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबीराचे उद्घाटनीय कार्यक्रम श्री. झामसिंगजी येरणे, अध्यक्ष, कृ.स.तं.शि.सं.,देवरी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्रीमती कविता गायकवाड, उपविभागीय अधिकारी देवरी यांचे हस्ते पार पडले. या कार्यक्रमाप्रसंगी डाॅ. गगन गुप्ता, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, देवरी, डाॅ. दिपक धुमनखेडे, संस्थेच्या आधारस्तंभ सौ. कृष्णाताई येरणे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुनिलकुमार येरणे, संस्थेचे सचिव श्री. अनिलकुमार येरणे संस्थेच्या कोषाध्यक्षा सौ. जयश्रीताई येरणे, संस्थेच्या सहसचिव डॉ. सौ. प्रियंकाताई येरणे, उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, छत्रपती शिवाजी संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य हे मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये लोककल्याण डायग्नोसीस सेंटर नागपूर यांच्या सहकार्याने सीकल सेल व थॅलेसेमिया या रोगांचे निदान करण्याकरिता मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली ज्यामध्ये संपूर्ण रक्त तपासणी, लिव्हर कार्य तपासणी, मुत्रपिंडाचे कार्य तपासणी व थायरॉईड इ. तपासण्यांचा समावेश होता. याप्रसंगी तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्याविषयीचे योग्य मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी डाॅ. हेडगेवार रक्तपेढी, नागपूर यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचा देवरी तालुक्यातील एकंदरीत १२५० पेक्षा अधिक विद्यार्थी व नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरीता संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य, सी. एस. आयुर्वेदीक महाविद्यालय व हॉस्पिटल, सी. एस. नर्सिंग काॅलेज, सी. एस. काॅलेज ऑफ फार्मसी व सी. एस. इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील एन.एस.एस. विभागाची चमू यांनी सहकार्य केले.








