
सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):——- ——
नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत बफर क्षेत्रातील गावाच्या विकास,रोजगार निर्मिती व वनसंवर्धन विषयक मार्गदर्शनासाठी गट ग्रामपंचायत दोडके जांभळी येथे संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते
सदर सभेत अध्यक्ष स्थानी प्रीतम सिंग कोडापे,उपसंचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोली उपस्थित होते
यावेळी डोंगरगाव वन्यजीव चे वनपरिक्षेत्र अधिकारी कु. सी.बी.भडांगे तसेच बफर क्षेत्रातील दोडके जांभळी या गावातील ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी गावकरी तसेच वन विकास महामंडळ एफडीसीएम चे वनपरिक्षेत्र अधिकारी मूलचंद नंदेश्वर,राजू डोंगरवार व वन विभागाचे कर्मचारी यांची संयुक्त सभा घेण्यात आली सभेमध्ये कोडापे यांनी नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील गोंदिया कोरक्षेत्र व बफर क्षेत्र तसेच संबंधित नियम व जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले,बफर क्षेत्रातील गावांमधील नागरिकांना विविध रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच वन संवर्धन वन्यजीव संरक्षण मानवी वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी गावकऱ्यांनी वन विभागाला सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले गावकरांनी वनविभागाच्या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याची ग्वाही दिली संयुक्त सभा पार पाडण्याकरिता वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले व गावकऱ्यांचे आभार मानले








