माजी मंत्री,आ.राजकुमार बडोले यांच्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांचा ओघ; समस्यांवर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनीश्वर):- —————–
अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय व तडफदार आमदार इंजिनिअर राजकुमार बडोले यांच्या सडक अर्जुनी येथील निवासस्थानी असलेल्या जनसंपर्क कार्यालयात दररोज पहाटे सहा वाजल्यापासूनच नागरिकांची रीघ लागलेली असते. परिसरातील नागरिकांच्या विविध अडचणी जाणून घेऊन त्या तातडीने सोडवण्यासाठी आमदार बडोले सातत्याने प्रयत्नशील असल्याचे येथे पाहावयास मिळते.
या जनसंपर्क भेटीत नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वीजपुरवठा, आरोग्य सेवा तसेच इतर नागरी समस्या मांडल्या. आ.बडोले यांनी प्रत्येक समस्या लक्षपूर्वक ऐकून घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
यावेळी त्यांनी संबंधित विभागप्रमुखांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. पाणीपुरवठा योजनेची नियमित देखभाल, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधीची तरतूद, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तांत्रिक सुधारणा तसेच आरोग्य सेवांची उपलब्धता वाढवण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जनतेच्या समस्या सोडवणे हेच आपले प्रमुख कर्तव्य असल्याचे सांगत आमदार बडोले म्हणाले की, नागरिकांच्या सहकार्याने आणि सामूहिक प्रयत्नांतून अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्र अधिक सुसज्ज, सक्षम व राहण्यायोग्य बनवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
दररोज सकाळपासून जनतेच्या कामांसाठी उपलब्ध राहणे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर प्रत्यक्ष कृती करणे, हे आमदार राजकुमार बडोले यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य ठरत असून नागरिकांमध्ये याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
“जनतेची सेवा हाच आमचा उद्देश” या भूमिकेतून आमदार बडोले सतत कार्यरत असल्याचे या जनसंपर्कातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें