डुग्गीपार पोलीस ठाण्यात सेवा निवृत्त पोलीस पाटलांचा भावनिक निरोप समारंभ, अपघातग्रस्त कुटुंबाला ₹36,300 ची आर्थिक मदत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):———— —

दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी डुग्गीपार पोलीस ठाणे अंतर्गत गाव कामगार पोलीस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्य शाखा डुग्गीपार यांच्या वतीने सेवा निवृत्त पोलीस पाटील इंद्रजीत राउत च्या सन्मानार्थ भव्य व भावनिक निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 लगत निसर्गरम्य वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्हाध्यक्ष राजेश बंसोड होते, तर विशेष अतिथी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक (API) जावेद शेख उपस्थित होते.कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील पोलीस पाटील, संघटनेचे पदाधिकारी व सद्स्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवा निवृत्ती हा कोणत्याही कर्मचाऱ्याच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक क्षण असतो. ग्रामीण स्तरावर प्रशासन व नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून वर्षानुवर्षे सेवा बजावणाऱ्या पोलीस पाटलांचे योगदान अमूल्य आहे.यावेळी वक्त्यांनी सेवा निवृत्त पोलीस पाटलांच्या निष्ठावंत सेवेचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

या कार्यक्रमात एक अत्यंत मानवी व कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला. डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या पोलीस पाटील सौ. सुनंदाताई मेश्राम यांचे पती श्री राजेंद्र मेश्राम यांना झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर त्यांना ₹36,300/- ची आर्थिक मदत देण्यात आली. पत्नीसमवेत पोलीस ठाण्याच्या मासिक सभेस जात असताना हा अपघात घडला होता.
ही मदत संघटनेच्या विविध शाखांच्या सहकार्यातून जमा करण्यात आली असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –
डुग्गीपार पोलीस ठाणे शाखा :– ₹22,000/-
आमगाव पोलीस ठाणे शाखा :– ₹7,400/-
केशोरी पोलीस ठाणे शाखा :– ₹3,000/-
रावणवाडी पोलीस ठाणे शाखा :– ₹2,100/-
देवरी पोलीस ठाणे शाखा :– ₹1,800/-
*एकूण ₹36,300/-* इतकी रक्कम अपघातग्रस्त कुटुंबास मदत म्हणून प्रदान करण्यात आली..

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ही बहुमूल्य व माणुसकीची मदत सौ. अनिता लंजेताई यांच्या पुढाकाराने, सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे व संघटनात्मक समन्वयातून यशस्वीरीत्या पूर्णत्वास गेली. त्यांच्या प्रयत्नांमुळे अल्पावधीत विविध शाखांकडून सहकार्य मिळाले. उपस्थित सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक केले..

मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास जिल्हा कार्यकारिणीतील विलास साखरे, मदनकर,
महिला पदाधिकारी – सौ. नंदा ठाकरे (जिल्हा महिला अध्यक्ष) व सौ. अनिता लंजे (महिला उपाध्यक्ष) उपस्थित होत्या.
तसेच जामभुलकर (चिचगड अध्यक्ष), टेंभरे (आमगाव), क्रांती बिसेन (रावणवाडी), डी. एम. बंसोड (देवरी), टीकाराम कापगते (नवेगाव), बनमाली मंडल (केशोरी), निलेश तुरकर (प्रसिद्धी प्रमुख, गोंदिया), सौ. रविता उईके जिल्हा कार्य. सदस्य, सराटे, भांडारकरजी,भेलावे, दीपक श्यामकुवर, तरोणेज, पाचे, पेंडाम आदींसह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते..

आयोजन व समारोप
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डुग्गीपार शाखेच्या सौ. अनिताताई लंजे, सुरेश बोरकर (अध्यक्ष, डुग्गीपार) व
उमेश वाढई (सचिव) यांनी केले. डुग्गीपार परिसरातून सौ. शिसुकला सहारे, उमेश सहारे,अनिल मेंढे,नेहरू उईके, दिनेश झिंगरे, मनोज सोनवाने, गेडाम सह सर्व पाटिल उपस्थित होते..

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मेश्राम यांनी केले. समारंभानंतर सर्व उपस्थितांसाठी वनभोजनाची व्यवस्था करण्यात आली व कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात संपन्न झाला..

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें