

सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):——————-
28 जुलै 2026 रात्री आठ वाजता महामार्ग क्रमांक 53 वर कोहमारा येथील महामार्ग पोलीस केंद्राच्या समोर रायपूर वरून नागपूरकडे जाणारा मालवाहू ट्रेलर क्रमांक एम एच 40 एके 2557 ने डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या बाजूला नागपूर वरून रायपुर कडे जाणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक एम हेच 40 सीएम 8084 ला जोरदार धडक दिली असून दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे मात्र दोन्ही ट्रकचे ड्रायव्हर किरकोळ जखमी झाले असून महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी राजू बस्तवाडे यांनी आपल्या सहकार्यांसोबत जाम झालेली रहदारी दुसऱ्या मार्गाने वळवून रहदारी मोकळी केली पुढील तपास डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार गुणवंत कटाने करीत आहे










