Edition

📅
-- --:--:--

सी.एस.इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘डिजिटल क्रांती’! मोबाईल EVM द्वारे विद्यार्थ्यांनी निवडले आपले सरकार; ८७ टक्के मतदान

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सी.एस.इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘डिजिटल क्रांती’!

मोबाईल EVM द्वारे विद्यार्थ्यांनी निवडले आपले सरकार; ८७ टक्के मतदान

देवरी(निखिल मुनीश्वर):—————-

स्थानिक सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, देवरी येथे बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी लोकशाहीचा अनोखा आणि हायटेक उत्सव पाहायला मिळाला. महाविद्यालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत पारंपरिक मतदान पद्धतीला फाटा देत ‘मोबाईल EVM’च्या माध्यमातून स्टुडन्ट कौन्सिलची निवडणूक घेतली.

या डिजिटल निवडणुकीत विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. महाविद्यालयातील एकूण ५६६ विद्यार्थी व कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ४९५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी तब्बल ८७ टक्के राहिली. तरुणाईमध्ये लोकशाहीविषयी असलेली जागरूकता या माध्यमातून अधोरेखित झाली.

तीन प्रमुख पदांसाठी अटीतटीची लढत

स्टुडन्ट कौन्सिलच्या प्रेसिडेंट, वाईस-प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी या तीन प्रमुख पदांसाठी थेट लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या मताधिक्याने—

– प्रेसिडेंट : प्रियम जैन — स्थापत्य अभियांत्रिकी, तृतीय वर्ष

– वाईस-प्रेसिडेंट : साहील फाये — स्थापत्य अभियांत्रिकी, तृतीय वर्ष

– सेक्रेटरी : दिप सोनकनेवारे — स्थापत्य अभियांत्रिकी, द्वितीय वर्ष

यांची विजयी निवड केली.

२० पदांसाठी गुणवत्तेच्या आधारावर निवड

मुख्य तीन पदांसोबतच ट्रेझरर, हॉल रिप्रेझेंटेटिव्ह, पेटिशन रिप्रेझेंटेटिव्ह, टेक्निकल को-ऑर्डिनेटर, डिपार्टमेंटल एक्झिक्युटिव्ह, स्पोर्ट्स एक्झिक्युटिव्ह आणि क्लास एक्झिक्युटिव्ह अशा विविध पदांसह एकूण २० महत्त्वाच्या पदांसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते.

या पदांची निवड केवळ लोकप्रियतेच्या आधारावर न करता गुणवत्ता, क्षमता आणि कडक मुलाखतींच्या माध्यमातून करण्यात आली.

प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी आयोजन

ही अभिनव निवडणूक प्रक्रिया महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एम. एम. तरोणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तर निवडणूक अधिकारी व स्टुडन्ट कौन्सिल इन्चार्ज म्हणून संगणक अभियांत्रिकी विभागाचे अधिव्याख्याता श्री. ए. ए. धमगाये यांनी निवडणुकीचे चोख नियोजन व अंमलबजावणी केली.

नवनिर्वाचित स्टुडन्ट कौन्सिलचे महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले. तंत्रज्ञानाची जोड देत शांततापूर्ण, पारदर्शक आणि सुव्यवस्थित पद्धतीने पार पडलेली ही डिजिटल निवडणूक विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीचा आधुनिक अनुभव ठरली.

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

error: Content is protected !!