गोंदिया जिल्ह्यात मॉडिफाईड सायलेंसरविरोधात पोलिसांची धडक कारवाई५ वाहनांवर कारवाई; फटाक्यासारख्या आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास थांबविण्याचा पोलिसांचा इशारा
गोंदिया(अनिल मुनीश्वर):—————————
जिल्ह्यात मोटारसायकलला मॉडिफाईड सायलेंसर लावून वाहने चालविण्याचे प्रमाण वाढले असून, या सायलेंसरच्या कर्णकर्कश आवाजामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हा पोलिसांनी मॉडिफाईड सायलेंसरविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.
दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक, गोंदिया यांच्या आदेशान्वये जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने गोंदिया शहरात मोटारसायकलला मॉडिफाईड सायलेंसर लावून वाहन चालविणाऱ्या एकूण ५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. संबंधित वाहने वाहतूक शाखेत डिटेन करण्यात आली आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक श्रावण गेडाम, छत्रपालसिंग चंदेल यांच्यासह वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. फटाक्यासारखा आवाज करणाऱ्या सायलेंसरवर कारवाईमॉडिफाईड सायलेंसरमुळे मोटारसायकलच्या आवाजाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढते. फटाक्यासारख्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने अशा प्रकारचे सायलेंसर लावून मोटारसायकल चालवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मॉडिफाईड सायलेंसर लावलेली वाहने आढळल्यास त्यांच्यावर प्रभावी कारवाई करून वाहने डिटेन करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा गोंदिया पोलिसांनी दिला आहे..
— AGMNEWS24
आपली बातमी, आपला विश्वास









