Edition

📅
-- --:--:--

✨जनता सहकारी बँक गोंदिया, शाखा लाखांदूरच्या नवीन वास्तूतील स्थानांतरणानिमित्त उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न✨

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लाखांदूर( अनिल मुनीश्वर ):————————

लाखांदूर (अनिल मुनीश्वर ):-

जनता सहकारी बँक गोंदिया, शाखा लाखांदूरचे नवीन वास्तूमध्ये स्थानांतरण करण्यात आले असून, त्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा आज उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. यापूर्वी काल नवीन वास्तूमध्ये सत्यनारायण महापूजा व लक्ष्मीपूजनाचा धार्मिक विधी संपन्न झाला.

या उद्घाटन सोहळ्यास प्रकाश येरणे, डॉ. मनोज डोंगरवार, पंडित झोळे, सौ. नाहले ताई, नाजुकरावजी कुंभरे, डॉ. लांजेवार, डॉ. नाकाडे, जनता सहकारी बँक गोंदियाचे संचालक डॉ. गजानन डोंगरवार, शाखा व्यवस्थापक अजित रामटेके तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नवीन वास्तू उपलब्ध करून दिल्याबद्दल घरमालक सौ. नाहले ताई यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात संचालक डॉ. गजानन डोंगरवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत नवीन वास्तूमुळे ग्राहकांना अधिक सुलभ, दर्जेदार व विश्वासार्ह बँकिंग सेवा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी नवीन शाखेच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देत बँकेच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना

traffic tail