Edition

📅
-- --:--:--

राष्ट्रीय महामार्गावर ९ जनावरांची अवैध वाहतूक उघडकीस दोन वाहनांसह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त; डुग्गीपार पोलिसांची कारवाई

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):-

दि. १२ ऑगस्ट २०२६ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर सावंगी परिसरात पोलिसांनी कारवाई  करत ९ जनावरांची अवैध व नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांना पकडले. या कारवाईत दोन वाहनांसह एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६.४५ ते ८ वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३, मौजा सावंगीपासून सुमारे ४ कि.मी. पश्चिमेस पोलीस पथक पेट्रोलिंग करीत होते. यावेळी दोन वाहने जनावरे घेऊन जात असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी दोन्ही वाहने थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान टाटा योद्धा वाहन क्र. MH 37/T 2589 मध्ये १ रेडा व ८ म्हशी, अशी एकूण ९ जनावरे आढळून आली. या जनावरांची अंदाजे किंमत ३ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच सदर वाहनाची किंमत ५ लाख रुपये आहे. दुसरे महिंद्रा पिकअप वाहन क्र. MH 36/AA 4291 असून त्याची अंदाजे किंमत ५ लाख रुपये आहे. दोन्ही वाहनांमध्ये जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक चारापाणी व इतर सुविधांची व्यवस्था नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. जनावरांना दाटीवाटीने व हालचाल करता येणार नाही अशा परिस्थितीत वाहतूक केली जात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी टाटा योद्धा वाहनचालक प्रशांत अशोक शिंगाडे (वय ४८, रा. औद्योगिक लाईन कामठी, ता. कामठी, जि. नागपूर) आणि महिंद्रा पिकअप चालक रूपेश मंगेश मोहितकर (वय २६, रा. अकोट, ता. पवनी, जि. भंडारा) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कायमी अपराध क्र. ३७४/२०२६ अन्वये प्राण्यांना क्रूरतेपासून प्रतिबंध अधिनियम, १९६० मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त मुद्देमालासह पुढील तपास डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात हवालदार दीपक खोटेले,जागेश्वर उईके,महेंद्र चौधरी, घनश्याम मुळे,बळीराम वाघाळे हे करीत आहेत.

जप्त मुद्देमाल ९ जनावरे — अंदाजे किंमत ₹३ लाख टाटा योद्धा वाहन — ₹५ लाख महिंद्रा पिकअप — ₹५ लाख एकूण मुद्देमाल — ₹१३ लाख

डुग्गीपार पोलिसांच्या या कारवाईमुळे जनावरांची नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली .

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना

traffic tail

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना