डिफेन्स फिटनेस क्लबचा भव्य शुभारंभ; मान्यवरांच्या उपस्थितीत तरुणांना शिस्त, फिटनेस आणि देशसेवेचा संदेश

गोंदिया(अनिल मुनीश्वर):============
तरुण पिढीमध्ये शिस्त, उत्तम शारीरिक तंदुरुस्ती आणि देशसेवेची भावना रुजविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या डिफेन्स फिटनेस क्लबचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला भारतीय सेना, महाराष्ट्र पोलीस, जनप्रतिनिधी, पत्रकार बांधव, विविध बँका व संस्थांचे पदाधिकारी तसेच गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
या प्रसंगी आमदार अविनाशजी ब्राह्मणकर, आमदार राजकुमारजी बडोले, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, निलेशजी जिभकाटे, दीपकजी जोक्यानी, महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमाताई ढेंगें, पंचायत समिती उपसभापती संदीपजी कापगते , पंचायत समिती सदस्य होमराजजी पुस्तोडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शारदाताई बडोले, लोकपालजी गहाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोरजी तरोणे, सरपंच मानेगाव राकेशजी चुटे, सरपंच जानवा किशोरभाऊ ब्राह्मणकर, नगरसेवक राधेश्यामजी भेंडारकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व्यंकटजी खोब्रागडे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रशांतजी शाहारे, उद्योजक परेशजी उजवणे, नयन रुखमोडे,ललितजी बाळबुद्धे , उद्योजक राकेशजी जयस्वाल, सुभेदार नरेशजी शेंडे तसेच युवा पत्रकार अश्विनसिंह गौतम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डिफेन्स फिटनेस क्लबचे संचालक सुधांशू मेहता यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना तरुणांना फिटनेससोबतच शिस्त, आत्मविश्वास आणि देशसेवेची प्रेरणा मिळावी, यासाठी क्लबच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
उद्घाटन सोहळ्यास मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे कार्यक्रमाला विशेष भव्यता प्राप्त झाली. या उपक्रमासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणारे सर्व मान्यवर, पत्रकार, पोलीस बांधव, बँक व विविध संस्थांचे पदाधिकारी, मित्रपरिवार आणि गावकरी यांचे सुधांशू मेहता यांनी मनःपूर्वक आभार मानले.
“आपले प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य हीच आमची खरी ताकद आहे. तरुणांना शिस्त, फिटनेस आणि देशसेवेची प्रेरणा देण्याच्या या कार्यात सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य सदैव लाभावे,” अशी अपेक्षा सुधांशू मेहता यांनी व्यक्त केली.









