Edition

📅
-- --:--:--

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आरोग्य केंद्रांच्या दुर्दशेवर आमदार विनोद अग्रवाल कठोर

एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीच्या बैठकीत औषधांपासून CHO उपस्थितीपर्यंत झाडाझडती

गोंदिया(अनिल मुनीश्वर):-

दि. २२ ऑगस्ट: ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर व चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पंचायत समिती गोंदिया येथील सभापती कक्षात आमदार विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची तिमाही बैठक पार पडली.

या बैठकीत आमदारांनी ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची पोलखोल करत अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले – “सरकारी आरोग्य केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांना औषधांसाठी भटकावे लागू नये. फक्त रजिस्टर भरण्याची खानापूर्ती सहन केली जाणार नाही.”

औषधे मिळाली नाहीत तर जबाबदारी निश्चित – ग्रामीण दौऱ्यात समोर आलेल्या तक्रारींचा पाढा वाचत आमदारांनी सांगितले की, PHC वर औषधांचा तुटवडा ही गंभीर बेपर्वाई आहे. औषधांची उपलब्धता नियमित ठेवावी आणि तक्रारीचे त्वरित निवारण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

CHO फक्त कागदावर नको – आरोग्य उपकेंद्रात CHO ने सक्रिय राहावे, घरोघरी जाऊन सेवा पोहोचवावी. त्यांच्या कामाची ग्रामसेवकांमार्फत देखरेख केली जावी, असे निर्देश दिले.

बोगस डॉक्टरांवर कारवाई, जर्जर केंद्रांची दुरुस्ती – ग्रामीण भागात विना परवाना प्रॅक्टिस करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई, जर्जर सब सेंटर्सची तातडीने दुरुस्ती आणि संस्थात्मक प्रसूतीचे लक्ष्य वाढविण्यावर त्यांनी भर दिला.

बैठकीला पंचायत समिती सभापती *मुनेश रहांगडाले*, BDO श्री लोंढे, निवासी वैद्यकीय अधिकारी श्री जायसवाल, तहसील वैद्यकीय अधिकारी नीलेश जाधव, जि.प. सदस्य दीपा चंद्रिकापुरे, वैशाली पंधरे, पूजा सेठ, शैलजा सोनवाने यांच्यासह ग्रामीण रुग्णालय, PHC आणि उपकेंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, CHO मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

AGM News 24,Gondia…

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

error: Content is protected !!