Edition

📅
-- --:--:--

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

…चुलबंद नदीपात्रातील रेती उत्खनन बंद करण्याची मागणी

 

सडक अर्जुनी(निखिल मुनीश्वर):—

तालुक्यातील घाटबोरी/हळदीघाट येथील श्री जय दुर्गा माता देवस्थान परिसरातील चुलबंद नदीच्या पात्रातून जेसीबीने रात्रीच्या वेळी रेती माफियांकडून सुरू असलेले रेती उत्खनन व उपसा तातडीने बंद करण्यात यावा, अशी मागणी देवस्थान समितीने तहसीलदार, सडक अर्जुनी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

श्री जय दुर्गा माता देवस्थान, घाटबोरी/हळबीघाट हे देवस्थान भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे विविध धार्मिक कार्यक्रम व उत्सवांचे आयोजन केले जाते. देवस्थान परिसरालगत चुलबंद नदीचे पात्र असून या परिसरात रेती उत्खनन व उपसा सुरू असल्याने देवस्थानाच्या परिसराला तसेच नदीपात्राला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

रेती उत्खननामुळे नदीपात्राची मोठ्या प्रमाणात हानी होत असून पर्यावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच देवस्थान परिसरात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

या पार्श्वभूमीवर चुलबंद नदीपात्रातील रेती उत्खनन व उपसा तातडीने थांबवावा, तसेच संबंधित ठिकाणी पाहणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी देवस्थान समितीचे अध्यक्ष सुरेश गोपीनाथजी गहाणे व सचिव देवाजी मारोतीजी बनकर व इतर सदस्य व गावकरी यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

 

निवेदनाची प्रत : मा. जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्याकडेही सादर करण्यात आली आहे.

 

 याबाबत तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांना विचारणा केली असता तात्काळ कारवाई करून सदर घटनास्थळावर जाऊन कारवाई करणार असल्याचे सांगितले

 अशा प्रकारच्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्कर सक्रिय झाले असून त्यावर तहसीलदार काय कारवाई करतात याकडे तालुकावाशी यांचे लक्ष लागलेले आहे

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

error: Content is protected !!