Edition

📅
-- --:--:--

पळसगावच्या जि.प. शाळेत शिक्षक दिनासह श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात बालगोपालांच्या हस्ते दहीहंडी फोडून जल्लोष; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पळसगावच्या जि.प. शाळेत शिक्षक दिनासह श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात

बालगोपालांच्या हस्ते दहीहंडी फोडून जल्लोष; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत…

सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर) :

जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव (भदु.) येथे शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक दिन तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक के. एच. चोपकर होते. प्रमुख अतिथी म्हणून सहायक शिक्षक एम. पी. बेंदवार, कु. एम. के. लढी, कु. ए. एस. कोरे, कु. शिवानी राऊत (गोटेफोडे) व कु. विजया हर्षे उपस्थित होते.

यावेळी श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत सजून आलेल्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. बालगोपालांच्या हस्ते दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. युक्ती बावनकुळे हिने केले, तर आभार प्रदर्शन कु. ईशानी सोनवणे हिने केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना गोपालकाल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक के. एच. चोपकर, सर्व शिक्षकवृंद, स्वयंपाकी ताई व त्यांच्या मदतनीस तसेच शालेय मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.

AGMNEWS24 | आपली बातमी, आपला विश्वास 

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

error: Content is protected !!