भारतीय लोककला परिषद संघटनेची सडक अर्जुनी तालुका कार्यकारिणी गठीत.
अध्यक्षपदी अनिता बाबोळे, उपाध्यक्षपदी संदेश राऊत तर सचिवपदी छबीलाल सूर्यवंशी यांची निवड 
सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):-
(दि. ६ सप्टेंबर 2026)कलाकारांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या आर्थिक व सामाजिक प्रश्नांसाठी संघटितपणे लढा देण्याच्या उद्देशाने भारतीय लोककला परिषद संघटनेची सडक अर्जुनी तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
आदिवासी विकास हायस्कूल, खजरी येथील सभागृहात रविवारी, ६ सप्टेंबर रोजी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
यामध्ये अध्यक्षपदी अनिता बाबोळे, उपाध्यक्षपदी संदेश राऊत तर सचिवपदी छबीलाल सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीमध्ये चैतराम बोरकर, युवराज सोनटक्के, राधेश्याम खोटेले, अंकोस हत्तीमारे, प्रमोद कोटागले, नरेश देशमुख, मधोराव मेश्राम, गजानन देवरे, येशवंत भोंडे, उदेलाला रहागडाले, ओंकार फुडे, धनराज उदापुरे, युवराज भराडे, राहुल कुसराम, जगदीश कावळे, दूधाराम कोरे, किशन राऊत व कुमार नेवारे यांचा समावेश करण्यात आला.
संघटनेच्या माध्यमातून कलाकारांना त्यांच्या कलेचा योग्य मोबदला मिळवून देणे, कलाकारांच्या समस्या शासन दरबारी मांडणे, कायदेशीर व कॉपीराइट हक्कांचे संरक्षण करणे, गरजू कलाकारांना विविध शासकीय योजना व सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे, तसेच नवोदित कलाकारांना व्यासपीठ व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी दामोदर राऊत, संदीप मेश्राम, शेसराव मेश्राम, चंद्रकुमार झीगरे, कणिराम मोटघरे, रमेश मेश्राम, गणेश अंबुले, युवराज मोहुर्ले, प्रल्हाद गायकवाड, सुरेश मेळे, आनंदराव कोहळे, भागवत मुनिश्वर, लक्ष्मण मळावी, दयाराम चाचेरे, रवींद्र झीगरे, रामेश्वर वंजारी, चोपराम आगाशे, युवराज उदापुरे व प्रकाश खोटेले यांच्यासह कलाकार व सभासद उपस्थित होते. कलाकारांनी संघटित होऊन आपल्या कला क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.









