Edition

📅
-- --:--:--

वाघाच्या हल्ल्यात ७२ वर्षीय शेतकरी ठार झुरकुटोला येथील पहाडीवरील जंगलातील घटना; वन विभाग व पोलिसांची घटनास्थळी धाव

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वाघाच्या हल्ल्यात ७२ वर्षीय शेतकरी ठार

झुरकुटोला येथील पहाडीवरील जंगलातील घटना; वन विभाग व पोलिसांची घटनास्थळी धाव 

सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):

तालुक्यातील झुरकुटोला येथील ७२ वर्षीय शेतकरी वातू बकाराम राऊत यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वातू बकाराम राऊत हे सकाळच्या सुमारास पहाडीवरील जंगल परिसरात FDCM कंपार्टमेंट नंबर 524 मध्ये बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. वाघाने त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती त्यांच्यासोबत असलेल्या इतर शेतकऱ्यांनी तातडीने गावात दिली. त्यानंतर पाटेकुर्रा येथील सरपंच प्रशांत बालसनवार यांनी वन विभाग व पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाच्या पथकाने परिसरात शोधमोहीम राबवून पुढील कार्यवाही सुरू केली.

मृतदेह शवविच्छेदनासाठी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास व कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे, जांभळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मूलचंद नंदेश्वर,पोलीस स्टेशन डुग्गीपारचे ठाणेदार कमलेश सोनटक्के तसेच संबंधित यंत्रणेकडून करण्यात येत आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,जंगल परिसरात वाघाचा वावर असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.

 

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

error: Content is protected !!