Edition

📅
-- --:--:--

वाघाच्या हल्ल्यात मृत राऊत कुटुंबीयांची आमदार बडोले यांनी घेतली सांत्वन भेट मृतकाच्या कुटुंबीयांना तातडीने मदत द्या; नरभक्षी वाघाचा शोध घेऊन जेरबंद करा — आमदार इंजि. राजकुमार बडोले

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वाघाच्या हल्ल्यात मृत राऊत कुटुंबीयांची आमदार बडोले यांनी घेतली सांत्वन भेट

मृतकाच्या कुटुंबीयांना तातडीने मदत द्या; नरभक्षी वाघाचा शोध घेऊन जेरबंद करा — आमदार इंजि. राजकुमार बडोले

सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):

तालुक्यातील वनविकास महामंडळाच्या क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात ७२ वर्षीय वातू बकाराम राऊत यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने झुरकुटोला व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांनी बुधवार, १६ सप्टेंबर रोजी झुरकुटोला येथील राऊत यांच्या निवासस्थानी भेट देऊन शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले.

सडक अर्जुनी तालुक्यातील वनविकास महामंडळ क्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक ५२४, जांभळी-दोडके परिसरात मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी वाघाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात वातू बकाराम राऊत, वय ७२ वर्षे, रा. झुरकुटोला यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर झुरकुटोला तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनक्षेत्रालगत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार इंजि. राजकुमार बडोले यांनी राऊत कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत संवेदना व्यक्त केल्या. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून, शासनाच्या माध्यमातून कुटुंबीयांना तातडीने आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार बडोले यांनी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी हल्ला करणाऱ्या वाघाचा तातडीने शोध घेऊन त्याला जेरबंद करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

दरम्यान, शासनाच्या वतीने मृतकाच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची मदत मिळणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी दिली. ही मदत कुटुंबीयांना विलंब न करता तातडीने मिळावी, यासाठी संबंधित विभागाने आवश्यक कार्यवाही करावी आणि त्यासाठी आपण गांभीर्याने लक्ष घालावे, असे आमदार बडोले यांनी सांगितले.

यावेळी पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, जिल्हा परिषद सदस्य डॉ. भूमेश्वर पटले, काटेकुर्रा सरपंच प्रशांत बालसनवार, विलास चव्हाण, रुपविलास कुरसुंगे, वन विभागाचे कर्मचारी सूर्यवंशी, चव्हाण, राऊत कुटुंबीय तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

error: Content is protected !!