Edition

📅
-- --:--:--

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

2010 च्या शासकीय आदेशा नुसार आदिवासी उपयोजना क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीचा लाभ द्या….

   जनता शिक्षक महासंघाची आमदार संजय पुराम यांच्याकडे मागणी.

 

सडक अर्जुनी (अनिल मुनीश्वर):-

 

   जनता शिक्षक महासंघाच्या वतीने आमगाव देवरी क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांची भेट घेऊन शिक्षकांच्या समस्येवर चर्चा करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातून चार तालुके वगळण्यात आलेले आहेत बाकी चार तालुके नक्षलग्रस्त म्हणून आजही घोषित केलेले आहेत. 

   काही दिवसापूर्वी संपूर्ण गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जात होता त्यानुसार संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ दिला जात होता. परंतु आता गोंदिया जिल्ह्यातील फक्त चारच तालुके नक्षलग्रस्त आहेत तर बाकीचे वगळण्यात आलेली आहे या वगळण्यात आलेल्या चार तालुक्यातील काही गावे आदिवासी उपयोजना अंतर्गत आहेत. या 2010 च्या शासकीय आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या गावांमध्ये 40% पेक्षा आदिवासींची संख्या जास्त आहे त्या भागात हे लाभ मिळत आहेत. परंतु गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, तिरोडा, गोरेगाव, सडक अर्जुनी या तालुक्यातील गावांना या योजनेनुसार फायदा मिळत नाही याकरिता आमदार संजयजी पुराम यांची भेट घेऊन ही समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तामिळनाडू सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही 2010 पूर्वीच्या शिक्षकांना TET मधून वगळण्याचा निर्णय घ्यावा.

   त्याचबरोबर S-14 ची योजना 2002 पासून जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू करुन थकबाकीसहित लाभ देणे.त्याचबरोबर केंद्रीय शाळेमध्ये त्याच गावातील मानधनावर एक सुशिक्षित कम्प्युटर ऑपरेटर जि. प. किंवा ग्रामपंचायत कडून उपलब्ध करून देणे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये स्वयंपाकीन बाई व मदतनीस यांचे मानधन कमीत कमी पाच हजार रुपये करणे. FSSA/FBO ची जाचक व किचकट नोंदणी मुख्याध्यापकांना बंधनकारक न करणे. शाळेतील मुख्याध्यापकांना ग्रामसेवक पदाचा चार्ज न देणे.अशा शिक्षक हितांच्या मागण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार महोदय आणि शासकीय स्तरावर या सर्व प्रश्नांवर चर्चा करून सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात येईल अशा प्रकारे अस्वस्थ केले.

  निवेदन देतेवेळी जनता शिक्षक महासंघ जिल्हाध्यक्ष प्रा. लक्ष्मण आंधळे उपाध्यक्ष लोकनाथ तितराम, गोपीनाथ ठुले , प्रा.उत्तम तांदळे, नितीन तिडके,दीपक कापसे, शरद बोंद्रे, देवरी तालुका अध्यक्ष भारत सोनटक्के, विलास शहारे, नरेश कोरे,उपाध्यक्ष प्रकाश घुगे, जितू कोहाडकर, नंदू भोयर, गणेश डोईफोडे,अजय कराळे, माधव बडे इत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

error: Content is protected !!