
देवरी(निखिल मुनीश्वर):
सी.एस. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, देवरी यांच्या वतीने आज दिनांक २५ जून २०२६ रोज गुरुवारला बोरगाव बाजार येथे भव्य ‘मोफत आरोग्य तपासणी व आयुर्वेदिक वैद्यकीय शिबिराचे’ आयोजन करण्यात आले.
या शिबीराचे उद्घाटन डाॅ. मंजुषा सोनपिपरे, प्राचार्या, सी. एस. आयुर्वेदीक महाविद्यालय व हॉस्पिटल यांच्या अध्यक्षतेखाली सौ. कल्पना देशमुख, सरपंच, बोरगाव/बाजार यांचे हस्ते व श्री. सी. आर. चाचेरे, ग्रामसेवक, बोरगाव/बाजार या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
‘निरोगी जीवनासाठी, आरोग्य शिबिराचा लाभ घ्या’ या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
बोरगाव बाजार येथील स्थानिक नागरिकांना तसेच परिसरातील जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. या शिबिरामध्ये सी. एस. आयुर्वेदीक महाविद्यालय व हॉस्पीटल येथील डॉक्टर, कंसल्टेंट व त्यांच्या चमूकडून सर्व रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करुन आयुर्वेदिक क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ वैद्य रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच आजारांचे निवारण आणि चांगल्या आरोग्यासाठी विशेष सल्ला दिला गेला. तपासणीनंतर रुग्णांना आवश्यक ती आयुर्वेदिक औषधे मोफत दिली गेली. एकंदरीत या आयोजनाकरीता सी. एस. आयुर्वेदीक महाविद्यालय व हॉस्पिटल येथील कार्यरत डॉक्टर्स, नर्सिंग स्टॉफ व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.










