
सडक अर्जुनी(निखिल मुनीश्वर ):——————————————-_——————————–तालुक्यातील पळसगांव येथे या पूर्वी जि.प. सदस्यांनी १० बोरवेल मंजूर करून काम पूर्ण झाले आहे. आणि त्याचा उपयोग सुद्धा गावकरी घेत आहेत. महिलांनी पाणी टंचाई समस्या विषयी मागणी पं.स. स /अर्जुनी येथे केली. त्या समस्याची त्वरित दखल घेऊन ग्रा. पं. सचिव भगतराम लांजेवार यांच्याशी संपर्क साधून पळसगांव (माताटोली )येथे १५ वा वित्त आयोगाच्या निधीने बोरवेल खोदून पाण्याची समस्या दूर करण्यात आली. सदर समस्या संपूर्ण गावात नसून मौजा पळसगांव, आकरटोली, माताटोली येथे लघु नळ पाणी पुरवटा योजना निर्माण करण्यात यावी असी मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर भुमेश्वर पटले यांनी ग्रामीण पाणी पुरवठा जि.प. गोंदिया येथे मागणी केली आहे.










