Edition

📅
-- --:--:--

गोंदिया जिल्हा नागरी-ग्रामीण पतसंस्था संघाच्या अध्यक्षपदी सुभाष आकरे, उपाध्यक्षपदी किशोर डोंगरवार, सचिवपदी संतोष बिसेन यांची बिनविरोध निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

गोंदिया(अनिल मुनीश्वर)दि. २३ : गोंदिया जिल्हा नागरी/ग्रामीण बिगर शेती व कर्मचारी सहकारी पतसंस्थांचा संघ मर्या., गोंदिया (रजि. क्र. २) च्या सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी नवनियुक्त संचालक मंडळाची पहिली सभा मंगळवारी गणेशनगर येथील गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव पदांची निवड बिनविरोध करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी विशाल वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी सुभाष गोविंदराव आकरे, उपाध्यक्षपदी किशोर बाबा डोंगरवार तर सचिवपदी संतोष रेखचंद बिसेन यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सर्व पदांसाठी एकमेव नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची निवड घोषित केली.

अध्यक्षपदासाठी सुभाष आकरे यांचे नाव सुमेश चैतराम कटरे यांनी सुचविले असून उमेश हिरालालजी यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी किशोर डोंगरवार यांचे नाव जयंत रघुनाथजी लांजेवार यांनी सुचविले तर सुखचंद पांडुरंग राऊत यांनी अनुमोदन दिले. सचिवपदासाठी संतोष बिसेन यांचे नाव गजानन रामदासजी चंदीवाले यांनी सुचविले व खुमेश चैतराम कटरे यांनी अनुमोदन दिले.

सभेला किशोर डोंगरवार, उमेश हिरालालजी, खुमेश कटरे, संतोष बिसेन, जयंत लांजेवार, मीना बिसेन, सुभाष आकरे, सुखचंद राऊत, महेश अहिरकर, गजानन चंदीवाले, सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर आदी संचालक उपस्थित होते.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना निवडणूक निर्णय अधिकारी विशाल वंजारी यांनी संघाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नव्या संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण पतसंस्थांच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना

traffic tail

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना