
देवरी(निखिल मुनीश्वर ):-
स्थानिक सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व सिएट मायलेज टायर्स, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने डिप्लोमा इन इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) च्या विद्यार्थ्यांकरिता ओपन कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. दिनांक २३ जुन २०२६ रोज मंगळवारला ओपन कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ऑडिटोरियम मध्ये सकाळी ११:३० वा. या कार्यक्रमाचे उद्घाटनीय सत्र डॉ. सुनिलकुमार येरणे, उपाध्यक्ष, कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था देवरी यांचे अध्यक्षतेखाली तसेच कु. मानसी गवळी, एस. एम. टी. एच. आर. सिएट मायलेज टायर्स, नागपूर, ज्ञानेश्वर बडवाईक, टि. ए. एच. आर. सिएट मायलेज टायर्स, नागपूर, एम. एम. तरोणे, प्राचार्य, सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, देवरी या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
या प्लेसमेंट ड्राईव्ह करिता पॉलिटेक्निकच्या एकूण ५२ विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून मुलाखती दिल्या त्यापैकी १७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागातून हर्ष सिंग गौर, अमन राऊत, मंगेश वासनिक, अणुविद्युत अभियांत्रिकी विभागातून रविंद्र मानकर, वैभव बघेले, पुनेश रहांगडाले, शालिकराम सोनघाटी, सलोनी बोहरे, शुभम चुटे तसेच संगणक अभियांत्रिकी विभागातून अमित बघेले या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
एकंदरीत या ओपन कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हला यशस्वी करण्यासाठी सी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील तिन्ही विभागाचे विभाग प्रमुख, ए. ए. रामटेके, ट्रेनिंग एण्ड प्लेसमेंट आफिसर, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.










