गोंदिया (अनिल मुनीश्वर):———————–
मागील अनेक दिवसांपासून गोंदिया शहरांमध्ये विशेष करून शाळा महाविद्यालय आणि खाजगी कोचिंग मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ड्रग्सचे व्यसन लागल्याचे अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण विभागातील पालक वर्ग आपल्या मुलांना मुख्यालय असलेल्या गोंदिया शहरांमध्ये चांगली शिक्षण व्यवस्था उपलब्ध असल्यामुळे इथे शिकायला पाठवतात. बरेच पालक आपल्या मुलांना भाड्याची खोली किंवा वस्तीगृहामध्ये राहायला लावून शिक्षण घेण्याची व्यवस्था करून देतात. मुले एकटे असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी व्यसनाधीन होत असल्याचे तक्रारी मागील अनेक दिवसांपासून गोंदिया शहरांमध्ये वाढलेली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर कुटुंबातील पालक वर्ग आपल्या मुलांना अतिशय काबाड कष्टाने कमावलेला पैसा आपल्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करतात. परंतु या मुलांना व्यसनाधीन करण्याचे कार्य शहरात वावरणारे ड्रग्स माफिया करत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष करून शाळा महाविद्यालय, खाजगी कोचिंग, खाजगी वस्तीगृह च्या परिसरात या ड्रग्स माफियांचा धंदा जोरात चालू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परंतु याबाबतीत पोलीस प्रशासन मात्र गप्प आहे त्यामुळे ड्रग्ज माफीयांचा धंदा जोरात चालू आहे. याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबाचा उज्वल भविष्य असलेले पोर उध्वस्त होत आहेत. या ड्रग्स माफियांना वेळीच आवर घालणं आवश्यकआहे. याबाबतीत आज जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर वराडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या ड्रग्स माफियांवर वेळीच कार्यवाही करून आवर घातला नाही तर गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला. यावेळी पीजी कटरे, राजकुमार पुराम, विशाल अग्रवाल, एडवोकेट दुष्यंत किरसाण, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चौधरी, जितेंद्र कटरे, डेमेद्र , रहांगडाले, जमील भाई पठाण, झहीर भाई अहमद,बाबा मिश्रा, महेश उके, अमन तिघाला जगदीश चुटे, बलजीत सिंग बग्गा, शैलेश बाहेकर , रंजीत गणवीर, जीवन शरणागत, कुणाल शेंडे आणि इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.










