Edition

📅
-- --:--:--

सेवा ही संघटन’ या संकल्पनेतून भाजयुमोतर्फे आमगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर,शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणी, मोफत औषध वितरण व आरोग्य योजनांचा घेतला लाभ

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

गोंदिया (अनिल मुनीश्वर):————————–

 

भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) आमगाव शहराच्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भारतीय जनता पक्षाचे पितृपुरुष डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त २८ जून रोजी आमगाव येथील पदमपूर परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणी, मोफत औषध वितरण तसेच विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला.

 

शिबिरात उपस्थित नागरिकांना आरोग्य तपासणीसोबतच आयुष्मान कार्ड व महात्मा फुले जनआरोग्य योजनेसंदर्भातील सेवांचाही लाभ देण्यात आला. आरोग्य तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम दिवसभर उपस्थित होती. तसेच नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सल्लाही देण्यात आला.

 

यावेळी आमदार संजय पुराम, भाजयुमो जिलाध्यक्ष रोहित अग्रवाल, भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार केशवराव मानकर, भेरसिंगभाऊ नागपुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयभाऊ शिवणकर, संपर्क प्रमुख वीरेंद्र अंजनकर, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. येशुलालजी उपराडे, जिल्हा महामंत्री नरेंद्रजी बाजपेयी, आमगाव भाजप शहराध्यक्ष मनोज सोमवंशी, संदीप थानथराटे, सौ. सुषमा भुजाडे (अध्यक्षा, महिला मोर्चा, आमगाव शहर), सौ. सुनंदा उके (अध्यक्षा, महिला मोर्चा, आमगाव तालुका), राजेश मानकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

 

आरोग्य शिबिरात वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉ. अनुराग बाहेकर, डॉ. गार्गी बाहेकर, डॉ. अक्षत अग्रवाल, डॉ. सतीश बन्सोडे, डॉ. शिवानी फुले, डॉ. युवराज दसरीया, डॉ. शिमेश्वरी मेश्राम आणि डॉ. गौरव पटले यांनी मोलाचे योगदान दिले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सर्व डॉक्टर, सहकारी संस्था, कार्यकर्ते तसेच उपस्थित नागरिकांचे आभार मानण्यात आले.

 

यावेळी भाजयुमो जिलाध्यक्ष रोहित अग्रवाल म्हणाले की, भारतीय जनता युवा मोर्चा ‘सेवा ही संघटन’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून समाजहित व जनसेवेच्या कार्यात सातत्याने सक्रिय आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजयुमो सातत्याने प्रयत्नशील आहे. आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य यांसारख्या योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य संरक्षणाचे प्रभावी माध्यम ठरत आहेत.

 

ते पुढे म्हणाले की, सध्याच्या काळात अशा आरोग्य तपासणी शिबिरांची गरज अधिक वाढली असून भविष्यातही अधिकाधिक ठिकाणी अशा प्रकारचे जनसेवा उपक्रम आयोजित करण्यासाठी भाजयुमो कटिबद्ध राहील.

 

या आरोग्य तपासणी शिबिरात ईसीजी, मधुमेह (शुगर) तपासणी, रक्तदाब तपासणी, लिपिड प्रोफाइल, युरिक अॅसिड तपासणी, थायरॉईड तपासणी, बोन डेन्सिटी तपासणी, मोफत औषध वितरण तसेच आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कार्डांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना

traffic tail

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना