गोंदिया(निखिल मुनीश्वर):–
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या SIR अभियान अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील #आमगाव विधानसभा मतदारसंघातील ‘BLA-2 भारतरक्षक’ प्रतिनिधींच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमरभाऊ वराडे, दुष्यंत कीरसान, पुरुषोत्तम (बाबा) कटरे, संपतजी सोनी, इसुलाल भालेकर, राम रामसिंग चव्हाण, राजू डोनोडे, राजकुमार पुराम, बंशीलाल अग्रवाल, संजय बहेकर, सौ. वंदनाताई काळे
, छायाताई नागपुरे , उषाताई मेंढे, विमलताई कटरे, विनाताई कटरे, राजेश चांदेवार, मोतीराम पीहीदे, निकेश मिश्रा उपस्थित होते.
SIR प्रशिक्षक श्री. गौतम नितनवरे यांनी BLA-2 भारतरक्षक प्रतिनिधींना SIR अभियानाची उद्दिष्टे, मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, बूथस्तरावरील जबाबदाऱ्या तसेच प्रत्यक्ष कामकाजाची पद्धत याबाबत अत्यंत प्रभावी, सविस्तर आणि मार्गदर्शक प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणादरम्यान उपस्थित प्रतिनिधींनी विविध शंकांचे निरसन करून अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी मतदार यादीतील प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश सुनिश्चित करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे, नाव व इतर तपशीलांतील त्रुटी दुरुस्त करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे तसेच प्रत्येक पात्र नागरिकाचा घटनात्मक मतदानाचा हक्क अबाधित राहावा यासाठी तळागाळात प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
मतदार यादीची अचूकता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता ही लोकशाहीची भक्कम पायाभरणी असल्याचे अधोरेखित करत, SIR अभियानाच्या माध्यमातून जनजागृती, संघटनबांधणी आणि बूथस्तरावरील कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
- या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे जिल्हा, तालुका व शहर स्तरावरील पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच BLA-2 भारतरक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










