गोंदिया (निखिल मुनीश्वर):—–
गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे सोमवार दिनांक 13 जुलै 2026 रोजी दुपारी 01 वाजता “रघुपती राघव राजाराम ” सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अयोध्येत जे घडले, ती केवळ देणगी किंवा दान यांची चोरी नाही, तर एक गंभीर पाप आहे. कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धेवर मोठा आघात आहे. धर्म ,न्याय, सदाचार आणि सन्मान यांचे मूर्तीमंत प्रतीक असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरातच अशा प्रकारचा घोटाळा केला जातो तेव्हा तो 100 कोटी हिंदूंच्या श्रद्धेवर झालेला इतिहासातील सर्वात मोठा आघात ठरतो. याच अनुषंगाने गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारा” रघुपति राघव राजाराम”सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे ,यावेळी दुपारी 01 वाजता शहीद भोला काँग्रेस भवन इथून भजन दिंडीच्या माध्यमाने प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन दानपेटी वर डल्ला मारणाऱ्या अंधभक्तांना कठोर शिक्षेची प्रार्थना करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहून दिंडीच्या माध्यमाने एकत्रित होऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आव्हान जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अमर वराडे यांनी केले आहे.










