नैनपुर/डुगीपार जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडकअर्जुनी(अनिल मुनीश्वर):—————–

मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर नैनपुर डुगीपार जवळील नवनिर्मित उड्डाणपुलाच्या परिसरात रविवारी पहाटे भीषण अपघातात एका बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना 22 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 1.30 वाजताच्या सुमारास घडली.

प्राथमिक माहितीनुसार, अग्रवाल ग्लोबल कंपनीने उभारलेल्या नव्या उड्डाणपुलाच्या आरीवालजवळून रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. या धडकेत दीड ते दोन वर्षे वयाच्या नर बिबट्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने तसेच दुग्गीपार पोलिस ठाण्याचे थानेदार गणेश वनारे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनविभाग व पोलिस विभागाच्या पथकाने पंचनामा करून मृत बिबट्याला ताब्यात घेतले.

सदर महामार्गावर वन्यप्राण्यांच्या वावराबाबत यापूर्वीही नागरिकांनी चिंता व्यक्त केली होती. वाढत्या वाहनांच्या वेगामुळे वन्यजीवांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.

मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून पुढील कायदेशीर कारवाई वनविभागामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील वन्यजीव संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे विशेष

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल