Edition

📅
-- --:--:--

स्वतंत्रता संग्राम सेनानी स्व. सुखदेवजी अग्रवाल यांची १२५ वी जयंती उत्साहात संपन्न गुरुनानक स्कूल ग्राउंडवर मुख्य जयंती समारोह; मान्यवरांची उपस्थिती

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्वतंत्रता संग्राम सेनानी स्व. सुखदेवजी अग्रवाल यांची १२५ वी जयंती उत्साहात संपन्न

गुरुनानक स्कूल ग्राउंडवर मुख्य जयंती समारोह; मान्यवरांची उपस्थिती

गोंदिया (अनिल मुनीश्वर ):-
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा माजी आमदार स्व. श्री. सुखदेवजी अग्रवाल यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गुरुनानक स्कूल ग्राउंड, गोंदिया येथे मुख्य जयंती समारोह उत्साहात आणि मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला.

समारंभाला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. इंद्रनील नाईक, खासदार श्री. राजेंद्र जैन, आमदार श्री. विनोद अग्रवाल, माजी आमदार श्री. गोपालदास अग्रवाल, नगराध्यक्ष श्री. सचिन शेंडे, माजी आमदार श्री. केशव मानकर, माजी आमदार श्री. हेमंत पटले यांच्यासह श्री. गिरीश व्यास, श्री. कमल अग्रवाल, रंजना अग्रवाल, सीताताई रहांगडाले, जयप्रकाश गुप्ता, दामोदर अग्रवाल, देवेंद्रनाथ चौबे, सीताराम अग्रवाल, पवन अग्रवाल, सत्व अग्रवाल, सावित्रीताई अग्रवाल, हरीजी अग्रवाल, हेमंत अग्रवाल, विनोद जैन, के.आर. शेंडे, दिनेश दादरीवाल, किरण मुंदडा, हुकुमचंद अग्रवाल, शिव शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.

प्रफुल पटेल यांचे दूरध्वनीवरून संबोधन

यावेळी राज्यसभा खासदार श्री. प्रफुल पटेल यांनी दूरध्वनीद्वारे समारोहाला संबोधित केले. स्व. सुखदेवजी अग्रवाल यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचे स्मरण करताना त्यांनी सांगितले की, त्यांचे जीवन त्याग, संघर्ष आणि राष्ट्रसेवेची प्रेरणादायी मिसाल आहे. त्यांच्या आदर्शांचा व विचारांचा अंगीकार करून समाज आणि राष्ट्रहितासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

स्वातंत्र्यलढ्यातील त्याग सदैव स्मरणीय : खासदार राजेंद्र जैन

खासदार श्री. राजेंद्र जैन यांनी आपल्या संबोधनात सांगितले की, महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्व. सुखदेवजी अग्रवाल यांनी स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. देशाच्या स्वातंत्र्याच्या संघर्षात त्यांनी ब्रिटिश राजवटीच्या लाठ्या सहन केल्या तसेच अनेकदा कारावासाच्या यातना भोगल्या. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचा त्याग, संघर्ष, तपस्या आणि समाजसेवेप्रती असलेले समर्पण सदैव स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले.

स्व. सुखदेवजी अग्रवाल यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी : पालकमंत्री

पालकमंत्री श्री. इंद्रनील नाईक यांनी स्व. सुखदेवजी अग्रवाल यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या त्याग व राष्ट्रसेवेला अभिवादन केले. त्यांचे विचार तसेच त्यांनी केलेले सामाजिक आणि राष्ट्रहिताचे कार्य भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहतील, असे त्यांनी आपल्या संबोधनात सांगितले.

AGMNEWS24 | गोंदिया
आपली बातमी, आपला विश्वास

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

error: Content is protected !!