सडकअर्जुनी(अनिल मुनीश्वर):—————————————————-
येथील शिव मंदिर जवळ मुख्य बस स्थानकावर NCMC (National Common Mobility Card) नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, या माध्यमातून नागरिकांना शासकीय सुविधांचा लाभ घेणे अधिक सोयीस्कर होणार आहे. विशेषतः महिलांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मृत्युंजय दुधपाचरे यांनी आपल्या परिसरात ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ते नेहमीच विविध शासकीय योजना यशस्वीपणे राबवून समाजोपयोगी कार्य करत असतात. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक नागरिकांना थेट लाभ मिळत आहे.
महिलांसाठी NCMC कार्ड बनविणे बंधनकारक करण्यात आले असून, ही बाब लक्षात घेऊन सडक अर्जुनी येथे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा.
तसेच, १८ वर्षांवरील सर्व महिला आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक (महिला व पुरुष दोघेही) यांच्यासाठीही हे कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.
तरी सर्व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह सडक अर्जुनी बसस्टॉप येथे जाऊन NCMC कार्ड तयार करून घ्यावे आणि शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा.
👉 ही संधी नक्कीच आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आहे – आजच लाभ घ्या!






