वाढदिवस जनसेवेचा… संकल्प निरोगी दृष्टीचा!
हर्ष मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सौंदड येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर
सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):
हर्ष मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मे आय बँक यांच्या सहकार्याने शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी सौंदड येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिक तसेच गरजू लाभार्थ्यांना मोफत नेत्र तपासणी व आवश्यक उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोतीबिंदू तपासणी तसेच गरजेनुसार शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या शिबिरातील विशेष सुविधेंतर्गत पूर्वनोंदणी करणाऱ्या पहिल्या १०० पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे गरजू नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हे शिबिर शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत, हर्ष मोदी यांच्या निवासस्थानी, सौंदड, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया येथे होणार आहे.
“डोळे जपा… दृष्टी निरोगी ठेवा!” या संदेशासह आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून वाढदिवसाच्या निमित्ताने जनसेवेचा संकल्प साकारला जाणार आहे.
आयोजक : हर्ष मोदी व मित्र परिवार









