Edition

📅
-- --:--:--

आमसभेपूर्वी गोडाऊनच्या शेडवर भल्या मोठ्या अजगराचे दर्शन; सभासदांमध्ये भीतीचे वातावरण

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आमसभेपूर्वी गोडाऊनच्या शेडवर भल्या मोठ्या अजगराचे दर्शन; सभासदांमध्ये भीतीचे वातावरण

सडक अर्जुनी (अनिल मुनीश्वर):—

तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, परसोडी/सडक येथे सर्व सभासदांची आमसभा संस्थेच्या गोडाऊनमध्ये आयोजित करण्यात आली होती. सभा सुरू होण्यापूर्वीच गोडाऊनच्या शेडवर भला मोठा अजगर आढळून आल्याने सभासदांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सभा सुरू होणार एवढ्यात काही सभासदांचे लक्ष गोडाऊनच्या वरच्या शेडकडे गेले. पाहणी केली असता शेडवर मोठा अजगर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अजगर पाहताच उपस्थित सभासदांमध्ये घबराट निर्माण झाली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ सभा थांबविण्यात आली.

दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष राजेश राऊत , उपाध्यक्ष धर्मेंद्र चव्हाण व सचिव उमेश भोयर  यांनी तात्काळ परिस्थितीची दखल घेत सर्पमित्राला पाचारण केले. सर्पमित्राच्या सहाय्याने मोठ्या शिताफीने अजगराला शेडवरून खाली उतरविण्यात आले. त्यानंतर अजगराला सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने नेऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

अजगर सुरक्षितपणे जंगलात सोडल्यानंतर सभासदांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि त्यानंतर संस्थेची आमसभा शांततेत पार पडली.

 आपली बातमी,आपला विश्वास       AGMNEWS24,

Oplus_16908288
Oplus_16908288

मुख्य संपादक : अनिल मुनीश्वर

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

error: Content is protected !!