AGMNEWS24
शेतकऱ्यांसाठी सहकार क्षेत्र आधुनिक व मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार : खा. राजेंद्र जैन
गोंदिया सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितीच्या आमसभेत प्रतिपादन
गोंदिया (अनिल मुनीश्वर) :
गोंदिया येथील वैभव लॉनमध्ये गोंदिया सहकारी शेतकी खरेदी-विक्री समिती लिमिटेड, गोंदियाची आमसभा आयोजित करण्यात आली. या आमसभेला खासदार राजेंद्र जैन यांनी उपस्थित राहून संचालक मंडळ, पदाधिकारी व सभासदांना संबोधित केले.
यावेळी खासदार राजेंद्र जैन म्हणाले की, आगामी काळात जिल्ह्यातील शेतकरी तसेच सामान्य नागरिकांच्या हितासाठी सहकार क्षेत्र अधिक मजबूत, आधुनिक आणि आदर्श करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. सहकारी संस्था या शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे बदलत्या काळानुसार या संस्था सक्षम व सुदृढ करणे गरजेचे आहे.
संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांवर सभासदांनी व्यक्त केलेला विश्वास ही त्यांची जबाबदारी आणखी वाढविणारी बाब आहे. हा विश्वास कायम ठेवत संस्थेला प्रगतीच्या दिशेने पुढे नेणे ही संपूर्ण संचालक मंडळाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमसभेला अध्यक्ष कैलासचंद्र हरिणखेडे, उपाध्यक्ष पन्नालाल सहारे, दीपक कदम, केतन तुरकर, संजय टेंभरे, तसेच संचालक चैनलाल धामडे, उमेद्र भेलावे, राहुल यादव, मंगल ठाकरे, योगेश तुरकर, महेंद्र कटारे, वजीर बिसेन, रामराज खरे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.









