Edition

📅
-- --:--:--

खोडशिवनीत श्री भगवान विश्वकर्मा स्मारक परिसरात सभामंडपाचे भूमिपूजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

☝️खोडशीवणी येथील श्री भगवान विश्वकर्मा स्मारक परिसरातील सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन करताना आमदार राजकुमार बडोले व उपस्थित मान्यवर.☝️

खोडशिवनीत श्री भगवान विश्वकर्मा स्मारक परिसरात सभामंडपाचे भूमिपूजन

आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते ७ लाखांच्या विकासकामाचा शुभारंभ; सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ग्रामस्थांना मिळणार हक्काचे व्यासपीठ

सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):

खोडशिवनी येथील श्री भगवान विश्वकर्मा स्मारक परिसरात मंजूर करण्यात आलेल्या ७ लाख रुपये निधीतील सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.

या सभामंडपामुळे स्मारक परिसरात विविध सामाजिक, धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी ग्रामस्थांना आवश्यक सुविधा व हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. स्मारक परिसराच्या विकासाच्या दृष्टीने हे बांधकाम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

भूमिपूजन कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, जिल्हा परिषद सदस्य निशाताई तोडासे, पंचायत समिती सदस्य डॉ. रुखीराम वाढई, सरपंच गंगाधर परशुरामकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, पोलीस पाटील संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भृंगराज परशुरामकर, उपसरपंच सत्यवान नेवारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

तसेच पोलीस पाटील मनोज शेंडे (खैरी), ग्रामपंचायत सदस्य आशिष टेंभुर्णे, इंदूबाई परशुरामकर, चांगुनाबाई टेंभुर्णी, दुर्गाताई कापगते, लोहार समाज तालुका संघटना अध्यक्ष अनिल बावणे, भोला कापगते, आस्तिक परशुरामकर, राजू परशुरामकर, ग्रामपंचायत सदस्य शुभम जनबंधू (सौंदड) यांच्यासह समाजबांधव, ग्रामस्थ व प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी सभामंडपाच्या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त केले. समाजबांधव व ग्रामस्थांनी आमदार राजकुमार बडोले यांचे आभार मानले. परिसराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांना प्राधान्य देऊन ती मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आमदार बडोले यांनी यावेळी दिली.

 

कार्यक्रमाचे संचालन दुर्योधन बावणे यांनी केले.

फोटो कॅप्शन : खोडशिवनी येथील श्री भगवान विश्वकर्मा स्मारक परिसरातील सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन करताना आमदार राजकुमार बडोले व उपस्थित मान्यवर.

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

error: Content is protected !!