वनरक्षक-वनपाल संघटनेच्या जिल्हा सचिवपदी चंद्रकांत गोदे बिनविरोध
कोहमारा येथील विभागीय कार्यकारिणीच्या सभेत निवड; कु. सुरेखा शिवणकर महिला वन्यजीव प्रमुखपदी बिनविरोध
सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):
महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनेच्या विभागीय कार्यकारिणीची सभा २० सप्टेंबर रोजी कोहमारा येथे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत संघटनेच्या जिल्हा सचिवपदी चंद्रकांत गोदे यांची, तर महिला वन्यजीव प्रमुखपदी कु. सुरेखा शिवणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळणार असून, वनरक्षक व वनपालांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. निवडीनंतर उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी चंद्रकांत गोदे आणि कु. सुरेखा शिवणकर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सभेला दीनदयाल मेश्राम, नरेशकुमार पातोडे, प्रमोद केळवतकर, विवेक अवस्थी, जिल्हाध्यक्ष दिनेश थेर, प्रमोद राऊत, अमितकुमार शहारे, जिया खान, बबीता डोरले, वैशाली मेहर, विद्यानंद राऊत, राजेश डोंगरवार, वनिता ब्राह्मणकर, शालू मेंढे, दामिनी लांजेवार, सुनील शेळके, नारायण मुनेश्वर, विलास गौतम, पोपट कांबळे, अमित शहारे, चौबे, वाढवे, मुंडे, सय्यद आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.









