आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीगणेश उत्सवानिमित्त उपक्रम; ७५ नागरिकांची आरोग्य तपासणी•
सडक अर्जुनी(अनिल मुनिश्वर):
☝️सडक अर्जुनी येथे बाल गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांची तपासणी करताना वैद्यकीय पथक व उपस्थित मंडळाचे पदाधिकारी.☝️
श्रीगणेश उत्सवानिमित्त बाल गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात सुमारे ७५ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
शिबिरात नागरिकांची रक्तदाब (बीपी) व रक्तातील साखरेची (शुगर) तपासणी करण्यात आली. यासोबतच नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
या आरोग्य शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्वेतांक ज्योतिषी, अधिपरिचारिका योगिता मेंढे, कल्पेश परतेकी (कक्षसेवक), स्वाती खोटेले, सोनम वाढई,उषा जगताप, नवल चौधरी आणि जाहिद अली यांनी सहकार्य केले.
शिबिराच्या आयोजनासाठी बाल गणेश मंडळाचे सदस्य उमेश उदापूरे, रोशन गहाणे, अविरत हिरापुरी, नगरसेवक विशाल शहारे, विलास खेडकर, नेपाळ भोंडे, किरण काटारे, संजय गहाणे यांच्यासह मंडळाचे अन्य सदस्य उपस्थित होते.
नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहून नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी तसेच अशा आरोग्यविषयक उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या सदस्यांनी केले…









