Edition

📅
-- --:--:--

देवरी येथे सिंगल कॉलम उड्डाणपुलासाठी देवरी कडकडीत बंद व मोर्च्यात नागरीकांचा  सहभाग. =================== ■ मोर्चा नगर पंचायत कार्यालया वरून हायवे रोडवरून एस.डी.ओ. कार्यालयावर धडकला. ■ देवरीचे उपविभागीय अधिकारी यांना  निवेदन सादर 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा


गदिया(अनिल मुनीश्वर):————_———————————————————————— जिल्ह्यातील देवरी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर साकोली व लाखनी शहराच्या धर्तीवर भव्य सिंगल कॉलम (पिलर असलेला) उड्डाणपूल तयार करण्यात यावा, या मागणीसाठी देवरी शहरातील नागरिक आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार (२० मे 2026) रोजी देवरी कडकडीत बंद ठेवून भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले. या बंद दरम्यान शहरात शांततेत मोर्चा  नगर पंचायत येथून हायवे रोड मार्गाने उपविभागीय कार्यालयावर गेला या ठिकानी देवरी चे उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले
या निवेदनात देवरी येथील राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांची सुरक्षा आणि शहराच्या भविष्याचा विचार करता ” पिलर कॉलम उड्डाणपूल” होणे अत्यंत गरजेचे आहे.सध्या महामार्ग प्राधिकरणा कडून प्रस्तावित असलेल्या किंवा तयार होत असलेल्या पारंपरिक भिंतीच्या पुलामुळे देवरी शहर दोन भागात विभागले जाण्याची शक्यता आहे. परिणामी स्थानिक व्यवसाय उद्ध्वस्त होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आम्हाला भिंत नको, तर पिलर असलेला उड्डान पूल हवा, अशी एकमुखी मागणीचा उल्लेख आहे.
साकोली व लाखनी येथे ज्याप्रमाणे आकर्षक आणि सुटसुटीत सिंगल कॉलम पूल उभारण्यात आले आहेत तसेच बांधकाम देवरीतही करण्यात यावे, अशी नागरिकांनी यावेळी मागणी केली. तहसील कार्यालयाच्या समोरील पूर्व भागातील नाल्यापासून ते थेट मोक्षधामजवळील पश्चिम भागातील नाल्यांपर्यंत हा उड्डाणपूल सलग बांधण्यात यावा. यामुळे शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी सुटेल आणि भविष्यातील अपघातांनाही आळा बसेल, असा विश्वास नागरिकांनी या प्रसंगी व्यक्त केला आहे.
या मोर्च्यात सर्व राजकिय पक्षाचे लोकप्रतिनीधी,पदाधिकारी,व कार्तकर्ते आणि सर्व समाजातील पदाधिकारी, सदस्यगण,तसेच शहरातील सर्व व्यवसाईक, नागरीक- महिला, षुरूष युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना

traffic tail

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना