Edition

📅
-- --:--:--

कृषिकन्यांचे पिंपळे ग्रामपंचायतीत जल्लोषात स्वागत

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🔴 AGMNEWS24, प्रतिनिधी 

पिंपळे (ता. पुरंदर, जि. पुणे) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर (पुणे) येथील कृषिकन्यांचे पिंपळे ग्रामपंचायतीच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.

ग्रामीण जागरूकता, कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक जोड (RAWE) २०२६-२७ अंतर्गत कृषिकन्या कल्याणी भांगे, प्रियंका मुनिश्वर, अपूर्वा कुंदप, समीक्षा मोकाशी, तनिष्का करंडे, पूजा गुंजवटे, रशिका काळे, रोहिणी करावंदे, कनिका कोचर, लोहिता व संचिता जाधव यांचे पिंपळे येथे आगमन झाले.

यावेळी सरपंच गौरी गोफणे, उपसरपंच अमोल सुधाकर पोमण, सारिका महेश दाते, किरण खेनट तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कृषिकन्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

सदर ग्रामीण जागरूकता व कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिकन्या पुढील सहा महिने पिंपळे शेतशिवारात विविध कृषी उपक्रम राबविणार आहेत. शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, कृषी नवकल्पना व विविध पिकांवरील प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर, ग्रामीण जागृती कार्यानुभव समन्वयक डॉ. स्वाती खांदवे तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. दीप्ती वाघधरेडॉ. पल्लवी सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

छायाचित्र : पिंपळे येथे कृषिकन्यांचे स्वागत करताना सरपंच गौरी गोफणे, उपसरपंच अमोल सुधाकर पोमण, सारिका महेश दाते, किरण खेनट, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ.

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना

traffic tail

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना