Edition

📅
-- --:--:--

शिक्षिका कल्पना चुटे यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गोंदिया (निखिल मुनीश्वर )-:

शिक्षण क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटवणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत परिश्रम घेणाऱ्या गोंदिया जिल्यातील आमगाव येथील के.के. इंग्लिश (पी) स्कूलच्या अभ्यासू शिक्षिका कु. कल्पना सुरेंद्र चुटे यांना ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. या घोषणेमुळे आमगाव परिसरासह संपूर्ण शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ​’ग्लोबल एलिट मीडिया अँड टेक’ यांच्या वतीने या मानाच्या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रातील समर्पण, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ​हा पुरस्कार म्हणजे केवळ एक सन्मान नसून त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा आणि त्यांच्या अविरत कष्टांचा हा खऱ्या अर्थाने गौरव आहे. अत्यंत प्रभावीपणे आणि आपुलकीने विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे काम त्यांनी नेहमीच केले आहे. त्यांच्या या यशात ‘व्हायरल इंडिया न्यूज’ आणि ‘अमेझिक’ यांचेही सहकार्य लाभले आहे. ​कु. कल्पना चुटे यांच्या या यशाबद्दल सडक अर्जुनी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनीश्वर,सालेकसा तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, प्रदीप बागडे,सुरेंद्र चुटे इंजी. ऋषींकुमार चुटे, निलेश चुटे, के.के. इंग्लिश स्कूलचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालक आणि आमगाव येथील नागरिकांकडून त्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, भविष्यातील त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. ​”शिक्षकी पेशा हा केवळ एक व्यवसाय नसून समाज घडवण्याचे उत्तम माध्यम आहे. कु. कल्पना चुटे यांच्यासारख्या आदर्श शिक्षिका आजच्या तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत!”

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना

traffic tail

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना