Edition

📅
-- --:--:--

राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांचा महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार यांचे आशीर्वाद विधान भवनात शक्तिप्रदर्शन; प्रफुल पटेल, भुजबळ, वळसे पाटील यांची उपस्थिती

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

AGMNEWS24,मुंबई, ता. 8 (प्रतिनिधी): महाराष्ट्रातून राज्यसभा सदस्य निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांनी आज विधान भवन, मुंबई येथे महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.

महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व माननीय खासदार  प्रफुल पटेल यांच्या आशीर्वादाने व महायुतीच्या पाठिंब्याने हा अर्ज भरण्यात आला.

उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी महायुतीतील प्रमुख नेत्यांनी मोठी उपस्थिती लावून एकजुटीचे दर्शन घडवले. यावेळी खासदार  प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार पार्थ पवार, मंत्री इंद्रनील नाईक, मंत्री आशिष शेलार, मंत्री भरत गोगावले, आमदार  समीर भुजबळ, आमदार  संजय खोडके, आमदार इंजि.राजकुमार बडोले, आमदार राजूभाऊ कारेमोरे व महायुतीचे इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करताना सर्व नेत्यांनी राजेंद्र जैन यांना शुभेच्छा दिल्या. महायुतीच्या संख्याबळानुसार राजेंद्र जैन यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग सुकर मानला जात आहे.

राजेंद्र जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान नेते असून विदर्भात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. महायुतीने त्यांना उमेदवारी देऊन विदर्भाला प्रतिनिधित्व देण्याचा संदेश दिला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना

traffic tail

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना