🔴 AGMNEWS24, प्रतिनिधी
पिंपळे (ता. पुरंदर, जि. पुणे) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर (पुणे) येथील कृषिकन्यांचे पिंपळे ग्रामपंचायतीच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
ग्रामीण जागरूकता, कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक जोड (RAWE) २०२६-२७ अंतर्गत कृषिकन्या कल्याणी भांगे, प्रियंका मुनिश्वर, अपूर्वा कुंदप, समीक्षा मोकाशी, तनिष्का करंडे, पूजा गुंजवटे, रशिका काळे, रोहिणी करावंदे, कनिका कोचर, लोहिता व संचिता जाधव यांचे पिंपळे येथे आगमन झाले.
यावेळी सरपंच गौरी गोफणे, उपसरपंच अमोल सुधाकर पोमण, सारिका महेश दाते, किरण खेनट तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कृषिकन्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सदर ग्रामीण जागरूकता व कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिकन्या पुढील सहा महिने पिंपळे शेतशिवारात विविध कृषी उपक्रम राबविणार आहेत. शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, कृषी नवकल्पना व विविध पिकांवरील प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर, ग्रामीण जागृती कार्यानुभव समन्वयक डॉ. स्वाती खांदवे तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. दीप्ती वाघधरे व डॉ. पल्लवी सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
छायाचित्र : पिंपळे येथे कृषिकन्यांचे स्वागत करताना सरपंच गौरी गोफणे, उपसरपंच अमोल सुधाकर पोमण, सारिका महेश दाते, किरण खेनट, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ.










