Edition

📅
-- --:--:--

शेंडा कोयलारी परिसरात मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी, आंतरराज्य टोळी सक्रिय,वाहनासह तीन आरोपी अटकेत 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सडक अर्जुनी,ब्युरो

आज 20 जून 2026 शनिवार रोजी गुप्त माहितीच्या आधारे सहवनक्षेत्र डोंगरगाव डेपो अंतर्गत बीट डोंगरगाव पुतळी सहाकेपार तसेच सहवनक्षेत्र पांढरवानी बफर अंतर्गत बीट कोयलारी शेंडा परिसरात सहवनक्षेत्र डोंगरगाव व पांढरवानी देवरी वनपरिक्षेत्र मधील कर्मचाऱ्यांनी सामूहिक पाळत ठेवली असता 20 जून 26 रोजी पहाटे 04 वाजता मौजा डोंगरगाव येथे सालेधारणी-डोंगरगाव रोडवर बोलेरो पिकप क्रमांक एम एच 35 एजे 1154 ने सागवान प्रजातीच्या मालाची अवैधरित्या वाहतूक करीत असताना तीन आरोपी 1.निलेश हिरालाल मेश्राम रा. कोयलारी (प्रधानटोला)ता.सडक अर्जुनी

2.ओंकार सहदेव सोनवाने रा.आलेडन जि. राजनांदगाव छ.ग.

3.खोमन बुधराम लोहार रा. दिवाणटोला जि. राजनांदगाव छ.ग.

आरोपींना अटक करून सडक अर्जुनी येथील न्यायालयात दाखल करण्यात आले,सदर कारवाई मध्ये क्षेत्र सहाय्यक कु.व्ही बी रहिले पांढरवाणी, क्षेत्र सहाय्यक चक्रधर एस. डोरले डोंगरगाव खजरी , वनरक्षक पवन कांबळे , मेहबूब सय्यद , विवेक काईट , सहसराम हटवार, माधव मुसळे , कु वनिता ब्राह्मणकर , कु शालू मेंढे,वनमजूर यशवंतजी शेंडे तसेच श्रीकांत बंसोड व समीर बंसोड यांचा सहभाग होता.

विशेष म्हणजे बफर क्षेत्रातील उपसंचालकासह सर्व वनअधिकारी तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी कान्हा केसरीच्या सहलीवर आहेत…

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना

traffic tail