पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे सद्भावना दिवसाच्या शपथेचे वाचन
गोंदिया(अनिल मुनीश्वर):—-
दिनांक २०/०८/२०२६ रोजी सद्भावना दिवसाचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे पोलीस निरक्षक योगिराज जाधव मानव संसाधन शाखा गोंदिया, यांनी सद्भावना दिवसाच्या अनुषंगाने शपथेचे वाचन करुन त्यापाठोपाठ उपस्थित असलेले पोलीस अधिकारी/अंमलदार/मंत्रालयीन कर्मचारी यांनी सामुहिक वाचन केले.
सदर कार्यक्रमात पोनि योगिराज जाधव तसेच गोंदिया पोलीस विभागातील पोलीस अधिकारी/अंमलदार मंत्रालयीन कर्मचारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.









