जिल्ह्याचे पालकमंत्री ना.इंद्रनील नाईकजी कार्यकर्त्यांच्या भेटी करीता राहणार उपस्थित
गोंदिया(अनिल मुनिश्वर):-
जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री इंद्रनील नाईकजी उद्या दि ०२/०९/२०२६ ला दुपारी ०१.०० ते ०२.०० वाजता पर्यंत खासदार श्री प्रफुल पटेलजी यांचे निवास स्थान रामनगर, गोंदिया येथे कार्यकर्त्यांच्या भेटी करिता उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्या सोबत खासदार श्री राजेंद्रजी जैन, आमदार श्री राजकुमारजी बडोले, जिल्हाध्यक्ष श्री प्रेमकुमार रहांगडाले, सौ राजलक्ष्मी तूरकर, श्री केतन तूरकर व जिल्ह्याचे सर्व सेल चे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी व सदस्य सर्व सेल व आघाड्यांचे पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व सेल चे तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य व प.स.सदस्य. न. प. सदस्य व सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे…









