सडक अर्जुनीत महाराजस्व अभियान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
13890 लाभार्थ्यांना लाभ, पीएम आवासच्या चाव्या व प्रमाणपत्रांचे वाटप

*सडक अर्जुनी, दि. 2 ऑगस्ट:*
मा. मुख्यमंत्री *श्री. देवेंद्रजी फडणवीस* यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री *स्व. अजितदादा पवार* यांच्या जयंतीनिमित्त आज सडक अर्जुनी येथील आशिर्वाद लॉन येथे *”छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान”* अंतर्गत विधानसभा स्तरीय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी राज्यसभा सदस्य *मा. श्री. प्रफुल पटेल* होते. तर स्वागताध्यक्ष म्हणून आमदार *मा. श्री. राजकुमारजी बडोले यांनी मार्गदर्शन केले*
*शिबिराला विधानपरिषद सदस्य अविनाश ब्राम्हणकर, जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर,अप्पर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, महिला व बालकल्याण सभापती सौ. पोर्णिमा ढेंगे, महामंत्री प्रशांत शहारे,पंचायत समिती सभापती चेतन वडगाये,सौ. चित्रलेखा चौधरी, आम्रपाली डोंगरवार, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शारदाताई बडोले, जिल्हा परिषद सदस्य डॉ. भुमेश्वर पटले,सीताताई रहांगडाले, रचना गहाणे, कविता रंगारी, लक्ष्मण भगत, सुधाताई रहांगडाले, यशवंत गणवीर, डॉ. अविनाश काशीवार,डी.यू. रहांगडाले,नगराध्यक्ष तेजराम मडावी, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनिश्वर, ओमप्रकाश टेभुर्णे, अरविंद मेंढे, लोकपाल गहाणे, रमेश चुऱ्हे, शिवाजी गहाणे, रजनी गिरीपुंजे,वंदना डोंगरवार,महेंद्र वंजारी शशिकला टेम्भूर्णे,पॉर्णिमा डोंगरवार,कामिनी कोवे,शाहिस्ता शेख, दीक्षा भगत, रीता लांजेवार,यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व हजारो नागरिक उपस्थित होते.*
*24 विभागांचे स्टॉल, 13890 लाभार्थी लाभान्वित दि. 22 जुलै ते 30 जुलै 2026 या कालावधीत गाव पातळीवर शासनाच्या योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचे नियोजन करण्यात आले होते.त्याप्रमाणे सदर शिबिरात महसूल, नगर विकास, ग्राम विकास,भूमीअभिलेख, कृषी, वन, *महावितरण, महिला व बाल विकास,गृह, आरोग्य, शिक्षण, सहकार, पशुसंवर्धन, कामगार कल्याण, आदिवासी विकास, समाजकल्याण, मोटार वाहन,पुरवठा*
*या सर्व विभागांमार्फत एकूण 13890 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन लाभ वितरीत करण्यात आले.*
*कार्यक्रमात सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली…*










