Edition

📅
-- --:--:--

विधानसभा स्तरीय समाधान शिबिर सडक अर्जुनी येथे 2 ऑगस्ट रोजी आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विधानसभा स्तरीय समाधान शिबिर सडक अर्जुनी येथे दोन ऑगस्ट रोजी आयोजन♦

सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):—-

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत अर्जुनी मोर विधानसभा स्तरीय समाधान शिबिर दिनांक 2 ऑगस्ट रोजी सडक अर्जुनी येथे सकाळी 10 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आशीर्वाद लोन शेंडा रोड सडक अर्जुनी या ठिकाणी पार पडणार आहे या शिबिरामध्ये महसूल विभागातील श्रावणबाळ संजय गांधी योजना शेतकऱ्यांची सातबारा दुरुस्ती व नका धारकांना पट्टेवाटप सेतू महा-ई-सेवा केंद्र द्वारे विविध दाखले वाटप तर पंचायत समिती विभागामार्फत व्ही व्ही जी रामजी अंतर्गत जॉब कार्ड वितरण व अद्यावतीकरण वैयक्तिक लाभाच्या कामाचे कार्यारंभ आदेश वितरण घरकुल लाभ वितरण एकलव्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारणे तसेच वन विभाग मार्फत वन्य प्राण्यांमुळे शेती पिक व पशुधन हानी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे तसेच भूमि अभिलेख विभागामार्फत गावठाण हद्दीतील नागरिकांना स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप रुपये दोनशे मध्ये पोट हिस्सा मोजणी अर्ज स्वीकारणे नगर विकास योजना मार्फत नागरी भागातील 2011 पूर्वीच्या अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत प्रत विक्रेत्यांना कर्ज वाटप प्रधानमंत्री आवास योजना तसेच महावितरण विभागामार्फत नवीन विज जोडणी बाबत मार्गदर्शन अर्ज स्वीकारणे बिल दुरुस्ती तक्रार निवारण व विविध योजनांची माहिती देणे बँक पोस्ट ऑफिस द्वारे आधार लिंक डीबीटी व विविध योजना बद्दल माहिती देणे महिला व बालविकास विभागामार्फत बालसंगोपन योजना कृषी विभागामार्फत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सामुग्रह विमा योजनेअंतर्गत मंजूर पत्रक वाटप राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मृदा पत्रिका वाटप पी एम किसान योजना तर पशुसंवर्धन विभागामार्फत विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प अंतर्गत उच्च उत्पादन क्षमता असलेली दुधाळ गाय किंवा म्हैस वाटप वैरण बियाणे कडबा कुतिर मशीन वाटप इत्यादी अंतर्गत मंजुरी प्राप्त लाभ वितरण व विविध योजनांबाबत मार्गदर्शन तसेच परिवहन विभागामार्फत लर्निंग लायसन बाबत मार्गदर्शन व वाहन विषयक व वाहतूक नियमांविषयी माहिती तर आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी रक्तदाब मधुमेह तपासणी यासोबतच समाज कल्याण आदिवासी विकास विभाग एकात्मिक बालविकास विभाग पोलीस विभाग आगार प्रमुख साकोली व इतर शासकीय विभाग यांचेकडील विविध योजनांची माहिती व अर्ज या शिबिरामध्ये स्वीकारले जाऊन या शिबिराचा अर्जुनी मोर विधानसभा विधानसभा क्षेत्रातील जनतेने लाभ घेण्याचे आवाहन आमदार राजकुमार बडोले यांनी केले आहे

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना

traffic tail

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना