सडक अर्जुनी तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर, 32 ठिकाणी महिला सरपंच
गोंदिया(अनिल मुनीश्वर):-
दि.9 सप्टेंबर 26: तालुका सडक / अर्जुनी येथील 63 ग्रामपंचायतींच्या सन 2025 ते 2030 या कालावधीतील सरपंच पदाचे सोडतीनंतरचे आरक्षण तहसीलदार कार्यालयाने जाहीर केले आहे. दि. 09/09/2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या विवरणपत्रानुसार हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
तहसीलदार इंद्रायणी गोमासे तहसील कार्यालय सडक अर्जुनी यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या यादीत सर्वसाधारण प्रवर्गासाठी सर्वाधिक 32 जागा, तर अनुसूचित जमातीसाठी 13, अनुसूचित जातीसाठी 9 आणि ना.मा.प्र. प्रवर्गासाठी 9 जागांचे आरक्षण निश्चित झाले आहे. एकूण 63 पैकी 32 ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच होणार आहेत.
प्रवर्गनिहाय आरक्षण :
सर्वसाधारण : 15
सर्वसाधारण (महिला) : 17
अनु. जाती : 5
अनु. जाती (महिला) : 4
अनु. जमाती : 7
अनु. जमाती (महिला) : 6
ना.मा.प्र. : 4
ना.मा.प्र. (महिला) : 5
सविस्तर यादी :सर्वसाधारण (15) : धानोरी, चिचटोला, डव्वा, पळसगाव/ड, कोहळीटोला/आ, भुसारीटोला, सावंगी, राजगुडा, कोहमारा, शेंडा, उशिखेडा, दल्ली, जांभळी/दो., कोसबी, श्रीरामनगर
सर्वसाधारण (महिला) (17) : हेटी, खोडीशिवनी, पाटेकुरा, तिडका, खजरी, खडकी, बाम्हणी/ख., कन्हारपायली, पुतळी, कोकणा/ज., रेंगेपार/पा., बौध्दनगर, कोयलारी, घाटबोरी/ते., कोसमतोंडी, पांढरी, चिखली
अनु.जाती (5) : मुरपार/राम, डुग्गीपार, रेंगापार/द., पळसगाव/रा., मुरपार/ले
अनु.जाती (महिला) (4) : सितेपार, गिरोला, वडेगाव, बोथली
अनु.जमाती (7) : घोटी, गोपालटोली, डुन्डा, डोंगरगाव/ख, सौंदड, कनेरी/राम, पांढरवाणी
अनु.जमाती (महिला)(6) : बोपाबोडी, बाम्हणी/सडक, फुटाळा, घाटबोरी/को., राका, घटेगाव
ना.मा.प्र. (4) : चिरचाडी, खांडीपार, गोंगले, मुंडीपार/इ.
ना.मा.प्र. (महिला) (5) : म्हसवाणी, परसोडी, खोबा, सिंदीपार, कोदामेडी
🤝 AGM NEWS 24 🤝
मुख्य संपादक-अनिल मुनीश्वर
🚩आपली बातमी,आपला विश्वास🚩









