Edition

📅
-- --:--:--

गोंदिया सहकारी खरेदी-विक्री संस्थेतर्फे दीपक कदम यांचा सत्कार सहकार क्षेत्राच्या विकासासाठी तालुकास्तरावर प्रशिक्षण शिबिरे घेणार; सुमारे २०० संस्था प्रतिनिधींची उपस्थिती

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गोंदिया सहकारी खरेदी-विक्री संस्थेतर्फे दीपक कदम यांचा सत्कार

सहकार क्षेत्राच्या विकासासाठी तालुकास्तरावर प्रशिक्षण शिबिरे घेणार; सुमारे २०० संस्था प्रतिनिधींची उपस्थिती

गोंदिया (अनिल मुनीश्वर) :

गोंदिया सहकारी खरेदी-विक्री संस्था लिमिटेड, गोंदियाची आमसभा स्थानिक वैभव लॉन येथे उत्साहात पार पडली. यावेळी गोंदिया जिल्हा सहकारी बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दीपक कदम यांचा संस्थेतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष कैलासचंद्र हरिनखेडे, उपाध्यक्ष पन्नालाल सहारे, संचालक राहुल यादव, उमेद्र भेलावे, वजीर बिसेन यांच्यासह मान्यवर संचालकांनी दीपक कदम यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले.

यावेळी बोलताना दीपक कदम यांनी जिल्ह्यातील सहकारी संस्थांना आवश्यक सहकार प्रशिक्षण देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. प्रत्येक तालुकास्तरावर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भातील सहकार क्षेत्र मागे असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी संस्थांना प्रशिक्षण व मार्गदर्शनाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला खासदार राजेंद्र जैन, माजी सभापती संजय टेंभरे, बँक संचालक केतन तूरकर यांची विशेष उपस्थिती होती. आमसभेला जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांचे सुमारे २०० प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संस्थांच्या माध्यमातून सहकार चळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि संस्थात्मक विकासावर भर देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

error: Content is protected !!