Edition

📅
-- --:--:--

पाटेकुर्रा येथे गणेश आरतीत आमदार बडोले, जि.प. अध्यक्ष भेंडारकर सहभागी सार्वजनिक बाल गणेश मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेत ग्रामस्थांना दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पाटेकुर्रा येथे गणेश आरतीत आमदार बडोले, जि.प. अध्यक्ष सहभागी,सार्वजनिक बाल गणेश मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेत ग्रामस्थांना दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर): 

तालुक्यातील पाटेकुर्रा येथे सार्वजनिक बाल गणेश मंडळाच्या वतीने स्थापित करण्यात आलेल्या श्री गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी १७ सप्टेंबर रोजी भेट दिली.

 

यावेळी सायंकाळी आयोजित गणेश आरतीमध्ये आमदार राजकुमार बडोले व जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी सहभागी होत श्री गणरायाची आरती केली. भक्तिमय वातावरणात आरती संपन्न झाली. त्यानंतर मान्यवरांनी गणरायाचे दर्शन घेत मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.

 

गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवक व बालकांमध्ये सामाजिक एकोपा, संस्कार आणि सांस्कृतिक जाणीव निर्माण होण्यास मदत होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. सार्वजनिक बाल गणेश मंडळाच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांचे मान्यवरांनी कौतुक केले.

 

यावेळी आमदार बडोले व जि.प. अध्यक्ष भेंडारकर यांनी पाटेकुर्रा येथील ग्रामस्थांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. गणेशोत्सव शांतता, उत्साह आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहनही करण्यात आले.

 

कार्यक्रमाला सरपंच प्रशांत बालसंनवार, भागवत झिंगरे, तसेच सार्वजनिक बाल गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला, युवक व बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पाटेकुर्रा येथील गणेशोत्सवातील आकर्षक सजावट, धार्मिक कार्यक्रम आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून गावातील सामाजिक व सांस्कृतिक वातावरण अधिक उत्साही होत असल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.

 

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

error: Content is protected !!